जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांचा युवा संवाद दौरा संपन्न...
राहुल चव्हाण @ बारामती
बारामती: आज जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र मध्ये युवा संवाद दौरा दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री.सुधीरजी नाईक यांचा इंदापूर,दौंड, बारामती आदि ठिकाणी दौरा होता.
बारामती शहर याठिकाणी बारामती तालुक्यातील मोठ्या संख्येने रामोशी समाजातील तरुण उपस्थित होते.त्यावेळी प्रथमता राज्य युवक अध्यक्ष सुधीर नाईक यांचे स्वागत तालुका युवक अध्यक्ष नानासाहेब मदने यांनी केले यावेळी धनाजी जाधव,डोर्लेवाडी गावचे पोलीस पाटील नवनाथ मदने, सोमनाथ मदने तसेच इंदापुर येथे प्रकाश चव्हाण, उदमाईवाडीचे शिवाजी माने तसेच मोठ्या प्रमाणात युवक वर्ग उपस्थित होते.
यावेळी सुधीर नाईक यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सर्व समाजातील तरुणांनी एकत्र येऊन संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले तसेच राजे उमाजी नाईक महामंडळाच्या माध्यमातून युवकांनी व्यवसायात पदार्पण करावे.आणि काही अडचणी असतील माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.यावेळी उपस्थित समाजातील ज्येष्ठ साहित्यिक सि.म. जाधव यांचा सन्मान करण्यात आला.