हरिभाऊ वराट यांची जामखेड तालुका अध्यक्ष पदी चौथ्यांदा निवड..
मनरेगा अंतर्गत रोजगार सहाय्यक संघटना नवी कार्यकारिणी जाहीर..
प्रतिनिधी राविकुमार शिंदे अहिल्यानगर
पंचायत समिती जामखेड येथील सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व रोजगार सहाय्यक बांधवांच्या उपस्थितीत अधिवेशन पार पडले. यावेळी जामखेड तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली हरिभाऊ वराट यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या अधिवेशनात सपूर्ण लोकशाही प्रक्रियेनुसार रोजगार सहाय्यक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड यशस्वीरित्या करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर अनिल गंगावणे, कर्जत तालुका अध्यक्ष युवराज नवसरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रवीण आहेर (कोपरगाव), राहुरी - जालिंदर रोडे, तसेच तालुका सचिव - अर्जुन तापकीर (कर्जत) तालुका कार्यक्रम आधिकारी समीर शेख साहेब हे उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष - हरिभाऊ वराट, उपाध्यक्ष - ज्ञानेश्वर लबडे, पिंपरखेड ग्रा.पं., सचिव मुक्तार शेख, जवळा ग्रा.पं., खजिनदार नाना सावंत, शिउर ग्रा.पं., सल्लागार - बापूराव वाळुंजकर, शाहुराव जायभाय, अमृत बारवकर, सुदाम कोल्हे, संतोष जोरे.