Breaking News
recent

खतगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी.

 



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

बिलोली तालुक्यातील मौजे खतगांव येथे प्रज्ञावंत प्रज्ञासुर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.दि.२५ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सामुहिक वंदना घेऊन मान्यवरांकडून अभिवादन  करण्यात आले.

प्रथमतः बुद्ध विहारात बोधीसत्व भगवान गौतम बुद्ध यांच्या अर्धाकृती पुतळ्यास वंदन करून नंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर सहशिक्षक तथा उत्कृष्ट व्हाॅलीबाॅलपटू व्यंकटराव पाटील खतगांवकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.मान्यवर स्वागत समारंभ,लहान मुलांसह कवी,गीतकार,पञकार जाफर आदमपूरकर व प्रतिष्ठित नागरिक विचारवंत गोविंद जाधव पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त करीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वक्षेञिय थोरपण विषद केले.

सदरील कार्यक्रमास खतगांव सरपंच सौ.मल्लाबाई मल्लेश पेटेकर, सहशिक्षक व्यंकटराव पाटील खतगांवकर,गोविंदराव पाटील,  शंकरराव पाटील,बालाजी पाटील,  गोविंद जाधव,जाफर आदमपूरकर,  ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बुध्देवार, मुन्ना बुध्देवार,आजी,माजी ग्रामपंचायत व जयंती मंडळ पदाधिकारी,गावकरी, पञकार,बौद्ध उपासक,उपासिका, तरूण,लहान मुले,नागरिक महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती.


Powered by Blogger.