साधना हायस्कूल देगलूरच्या शाळेमध्ये श्री. श्रेयश शिवाजी कदम चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
देगलूर तालुक्यातील देगलूर ची साधना हायस्कूल येथे शिवाजी पाटील कदम यांचा मुलगा श्रेयश शिवाजी कदम साधना हायस्कूल शाळेतून इयत्ता पाचवी वर्गातून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती.
त्या परीक्षेचा निकाल 25 रोजी जाहीर झाले असल्याने त्याने या परीक्षेत 298 गुण पैकी तब्बल 182 गुण मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशामागे साधना हायस्कूलचे सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांचा हातभार आहे.
मिळवलेल्या यशाबद्दल मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक समस्त शिक्षक व कर्मचारी वृंद सर्वांनी मिळून अभिनंदन चा वर्षाव केला.